सिस्टमचा आढावा

घटकांची नावे आणि फंक्शन्स


खालील तुमच्या सिस्टमच्या कंट्रोल पॅनल आणि स्टीयरिंग व्हील रिमोट कंट्रोलवरील घटकांची नावे आणि फंक्शने स्पष्ट करते.

कंट्रोल पॅनेल

टीप
  • वाहन मॉडेल किंवा वैशिष्ट्यांवर अवलंबून, सिस्टम घटकांचे स्वरूप आणि लेआउट वास्तविक उत्पादनापेक्षा भिन्न असू शकतात. क्विक रेफरन्स गाइड पहा.
  • इन्फोटेनमेंट/क्लायमेट स्विच करण्यायोग्य कंट्रोलर बद्दल माहितीसाठी, इन्फोटेनमेंट/क्लायमेट स्विच करण्यायोग्य कंट्रोलर मॅन्युअल पहा (http://webmanual.kia.com/SwitchableController/index.html) (सुसज्ज असेल तर).

रेडिओ बटण
  • रेडिओ चालू करा. रेडिओ ऐकत असताना, रेडिओ मोड बदलण्यासाठी वारंवार दाबा.
  • रेडिओ/मीडिया निवड विंडो डिस्प्ले करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
मिडिया बटण
  • मीडिया स्टोरेज डिव्हाइसवरून सामग्री प्ले करा.
  • मीडिया निवड विंडो डिस्प्ले करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
कस्टम बटण ()
  • एक कस्टम फंक्शन वापरा.
  • फंक्शन सेटिंग स्क्रीनवर प्रवेश करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
पॉवर बटण (POWER)/व्हॉल्यूम नॉब (VOL)
  • रेडिओ/मीडिया कार्य चालू किंवा बंद करण्यासाठी दाबा.
  • स्क्रीन आणि आवाज बंद करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
  • सिस्टीमच्या आवाजाचा व्हॉल्यूम समायोजित करण्यासाठी नॉब डावीकडे किंवा उजवीकडे वळवा.
रीसेट बटण
  • सिस्टम रीस्टार्ट करा.
मागे/पुढे सर्च बटण (SEEK/TRACK)
  • रेडिओ ऐकत असताना, प्रसारण स्टेशन बदला.
  • मीडिया प्ले करत असताना, ट्रॅक/फाइल बदला. रिवाइंड करण्यासाठी किंवा फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा (Bluetooth ऑडिओ मोड वगळता).
सेटअप बटण
  • सेटिंग्ज स्क्रीनवर प्रवेश करा.
  • सॉफ्टवेअर आवृत्ती माहिती स्क्रीनॲक्सेस करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
सर्च नॉब (TUNE FILE)
  • रेडिओ ऐकत असताना, फ्रिक्वेन्सी समायोजित करा किंवा प्रसारण स्टेशन्स स्टेशन बदला.
  • मीडिया प्ले करत असताना, ट्रॅक/फाइल शोधा (Bluetooth ऑडिओ मोड वगळता).
  • शोधादरम्यान, वर्तमान ट्रॅक/फाइल निवडण्यासाठी दाबा.

स्टीयरिंग व्हील रिमोट कंट्रोल

टीप
वाहन मॉडेल किंवा वैशिष्ट्यांवर अवलंबून, सिस्टम घटकांचे स्वरूप आणि लेआउट वास्तविक उत्पादनापेक्षा भिन्न असू शकतात. क्विक रेफरन्स गाइड पहा.

व्हॉइस रेकग्निशन बटण ()
  • फोन प्रोजेक्शनद्वारे कनेक्ट केलेल्या स्मार्टफोनची आवाज ओळख सुरु करण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी दाबा. (स्मार्टफोन वैशिष्ट्यांनुसार बटणाचे फंक्शन बदलू शकते.)
MODE बटण
  • सिस्टम मोड बदलण्यासाठी बटण वारंवार दाबा. (रेडिओ, मीडिया इत्यादी)
  • फंक्शन सेटिंग स्क्रीनवर प्रवेश करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
व्हॉल्यूम लीव्हर/बटण (+/-)
  • सिस्टीम साउंडचा आवाज समायोजित करा.
म्यूट बटण ()
  • सिस्टीम साउंडचा आवाज म्यूट किंवा अनम्यूट करण्यासाठी बटण दाबा.
  • मीडिया प्ले करत असताना, प्लेबॅक थांबवा किंवा पुन्हा सुरू करा.
  • कॉल दरम्यान, मायक्रोफोन बंद करण्यासाठी दाबा.
सर्च लीव्हर/बटण ( )
  • रेडिओ ऐकत असताना, प्रीसेट यादीवरील प्रसारण स्टेशन्स दरम्यान स्विच करा. प्रसारणाचे स्टेशन शोधण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा. (बटण सेटिंगमध्ये वापरण्यासाठी तुम्ही कार्य निवडू शकता.)
  • मीडिया प्ले करत असताना, ट्रॅक/फाइल बदला. रिवाइंड करण्यासाठी किंवा फास्ट फॉरवर्ड करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा (Bluetooth ऑडिओ मोड वगळता).
पर्याय A
कॉल/ॲन्सर बटण ()
  • Bluetooth द्वारे मोबाईल फोन कनेक्ट करणे सुरू करा.
  • Bluetooth फोन कनेक्शन केल्यानंतर, तुमच्या कॉल इतिहासात प्रवेश करा. सर्वात अलीकडील फोन नंबर डायल करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा. जेव्हा कॉल येतो तेव्हा कॉलला उत्तर द्या.
  • 3-वे कॉल दरम्यान, सक्रिय कॉल आणि होल्ड कॉल यांदरम्यान स्विच करा. सिस्टम आणि मोबाईल फोन दरम्यान कॉल स्विच करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
कॉल एंन्ड बटण () (सुसज्ज असेल तर)
  • आलेल्या कॉल दरम्यान, कॉल नाकारा.
  • Bluetooth कॉल दरम्यान: कॉल समाप्त करण्यासाठी दाबा.
पर्याय B
कॉल/ॲन्सर बटण ()
  • Bluetooth द्वारे मोबाईल फोन कनेक्ट करणे सुरू करा.
  • Bluetooth फोन कनेक्शन केल्यानंतर, तुमच्या कॉल इतिहासात प्रवेश करा. सर्वात अलीकडील फोन नंबर डायल करण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
  • आलेल्या कॉल दरम्यान, कॉलला उत्तर द्या.
  • 3-वे कॉल दरम्यान, सक्रिय कॉल आणि होल्ड कॉल यांदरम्यान स्विच करा.
कॉल एंन्ड बटण () (सुसज्ज असेल तर)
  • आलेल्या कॉल दरम्यान, कॉल नाकारण्यासाठी दाबा आणि धरून ठेवा.
  • कॉल दरम्यान, कॉल समाप्त करा.
कस्टम बटण () (सुसज्ज असेल तर)
  • एक कस्टम फंक्शन वापरा.
  • सेटिंग्ज स्क्रीनवर प्रवेश करण्यासाठी कस्टम बटण (स्टीयरिंग व्हील) दाबा आणि धरून ठेवा.